आपण दोघांनी मिळून तुझ्या जन्मासाठी painless delivery ची तयारी आखली होती. तू तुझी कामगिरी बखुबी पार पाडलीस. आईच्या डोळ्यात अश्रूचा थेंब न येऊ देता, वेदनेची इतकुशीही जाणीव न होऊ देता, तू जन्माला आलीस.
तू जन्माला आल्याची बातमी मित्रमंडळी आणि नातेवाईक नातेवाईक यांना कळवितच होतो की एक फोन समोरूनच आला. कुणी पंचांग बघून तुझे भाविष्य सांगितले होते, ते असे, पौर्णिमेला रोहिणी नक्षत्रावर जन्माला आलेले हे बाळ फार सुलक्षणी असून आईवडिलांच्या आयुष्यात सुख - समाधान घेऊन आले आहे.
निसर्गदत्त कळांचा त्राणही आईच्या नेत्रात आणि गात्रात न उमटू देता जन्म घेणाऱ्या माझ्या बाळाचे हे भविष्या वर्तविण्यासाठी कुणा जोतीष्याने पंचाग बघायची गरज नव्हती.
माझ्या पोटी बाळाचा जन्म द्यायची वेळ आली तेव्हा ...
ब्रम्हदेवाने त्याच्या पोतडीतून
सर्वात हसरं, आनंदी आणि शहाणं बाळ काढलं
व गुरुवार २५ नोहेंबर १९९९ च्या पौर्णिमेला
सकाळी १२ वाजून ३९ मिनिटांच्या शुभ मुहूर्तावर
माझ्या पोटी जन्माला घातलं.
- सुप्रिया.
No comments:
Post a Comment