तू फक्त तीन महिन्यांची आहेस. पहाटेच्या पहिल्या गाडीने मी मुंबईहून पुण्याला निघाले आहे. एका मांडीवर तुला सांभाळत; दुसऱ्या मांडीवर डायरी ठेऊन माझे लिखाण चालू आहे. तुझा हा प्रवास माझ्याच आग्रहास्तव असून केवळ माझ्याशिवाय बाकी कुणालाच मुळीच पसंत नाही.
पण तुला माझा बेत आवडला. पुन्हा पुन्हा हसून तू तुझी मर्जी दाखवून देत आहेस. ते पाहून मला फार बरे वाटले. आपण दोघी खुश आहोत, मग आणखी काय पाहिजे?
घड्याळात आठ वाजलेत. आपण नुकतेच जे स्टेशन सोडले त्या मुंबईच्या आपल्या घरी तुझ्या दोन वर्षाच्या मोठ्या बहिणीचा मोठ्ठा भोंगा सुरु झाला असेल. उठल्यावर मी नाही दिसले म्हणजे तिला करमायचे नाही. आई शिवाय तिचे पानही हलत नाही. म्हणून मी येथे पळून आले.
सहा दिवसाच्या तुला घेउन मी हॉस्पिटल मधून घरी आले तेव्हापासून तुला छातीशी धरून शांत पडून राहण्या इतकाही अवधी तिने दिला नाही. आईआईआईआईआईआई असे एका दमात म्हणण्याचे जणू तिला व्यसन जडले आहे. तिची एकच एक आई असली तरी माझी दोन बाळे आहेत. तुझा छोटुसा निरागस चेहरा पाहून कुणीही पटकन तुला उचलून घेते. कुणीही घेते. पण तेच मी करायचा अवकाश की तत्क्षणी तुझ्या ताईला सपाटून भूक लागते; किंवा अनावर झोप येते; नाहीतर शी तरी होते. म्हणून तू व मी निघालो.
आता पुढच्या चार दिवसांचे चोवीस तास फक्त तुझ्याबरोबर राहीन. तुला तुझ्या गोष्टी सांगेन. तुझ्या गप्पा ऐकेन. आपण एकमेकांच्या कुशीत राहू. तसेच फिरू. तसेच झोपू. झोपताना मी तुला मनसोक्त गाणी म्हणेन. सकाळी उठल्या उठल्या गाडीतच आपण खेळायला सुरवात करू. मी हलके हलके तेल मालिश करून तुला मोठ्ठी आंघोळ घालेन. सुंदर कपडे घालेन; भरपूर नटवेन. आपण तुझे चिक्कार फोटो काढू. तुझी माझी अशी भेट पुन्हा दुर्मिळ! आपण आपल्या या आठवणींना फोटोतून, डायरीतून जपून ठेऊ.
तुला तीन महिने झाले असे मी मघाशीच सांगितले, तेवढ्यात तुला माझी काय ओळख झाली आहे मला सांगता यायचे नाही. कधी कधी असे वाटते की तुला तुझा बाबा म्हणजेच तुझी आई वाटतो कारण तू त्याच्या कुशीत रडायची शांत होतेस; व फक्त तोच तुला सर्वात कमी वेळात सर्वात गाढ झोपवू शकतो. आईकडे दूध पितेस; बाबाकडे ढेकर देतेस. बाबा तुझी दुसरी आई होउन तुला सांभाळतो. तो सांगतो की तू एक अत्यंत गोड मुलगी आहेस. तू आम्हाला कधीच त्रास देणार नाही आणि खरेच त्याचेच खरेच ठरते.
माझ्या पोटी जन्म द्यायची वेळ आली तेव्हा देवाने त्याचा पोतडीतून सर्वात हसरं, आनंदी आणि शहाणं बाळ काढलं आणि २३ नोव्हेंबर १९९९ च्या पौर्णिमेच्या सकाळी बारा वाजून ३९ मिनिटांनी माझ्या पोटी जन्माला घातलं.
तू घरात आल्यापासून पाठचे तीन महिने चुटकीसरशी सरले. आम्ही तुला संभाळण्यापेक्षा ते दिवस जणू तूच आम्हाला सांभाळून घेतलेस. आईची धावपळ चालू असली की तू पाळण्यात शांत झोपून रहायचे. जाग आली तरी एकटीच आपले आपण खेळायचे. त्यातून कोणी पाळण्यात डोकावलेच व नुसती नजरानजर झाली तरी बोळक्याची चंद्रकोर हनुवटीवर पसरते. उजव्या गालावरच्या पुसटशा खळीभोवताली केवढाले हसू फुटते.
एरव्ही कुणाला तुझ्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही म्हणून तू कधी नाराज होत नाहीस. नुकताच तू आपला एक मित्रही बनवला आहेस. आपल्या हॉलच्या भिंतीवर उंच टांगलेले सांबराचे लाकडी मुंडके - तो तुझा मित्र. तू जमिनीवर झोपून त्याच्याशी आकाराउकाराच्या गप्पा मारतेस. तुझे स्वत:चे असे एक आनंदाचे जग आहे, आम्ही तुझ्या जगात शिरलो की तो आनंद आम्हाला भारावून टाकतो. येणारा जाणारा तुझ्या रूपा-गुणाचे कौतुक करतो. कौतुकाचे ते बोल ऐकून आम्ही मनोमन सुखावून जातो.

No comments:
Post a Comment